अहेरीत साकारणार स्टेडिअम

By Admin | Updated: January 8, 2015 22:55 IST2015-01-08T22:55:57+5:302015-01-08T22:55:57+5:30

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यात मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत शहरी भागातील खेळाडूंपेक्षा ग्रामीण खेळाडू कमी पडू नयेत. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी,

Stadium in front of you | अहेरीत साकारणार स्टेडिअम

अहेरीत साकारणार स्टेडिअम

अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यात मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत शहरी भागातील खेळाडूंपेक्षा ग्रामीण खेळाडू कमी पडू नयेत. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच अहेरी येथे मोठे स्टेडिअम उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी केली.
आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित तीन दिवशीय सांघिक, वैयक्तिक, बालक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ना. आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या तालुका क्रीडा संमेलनात ३०० स्पर्धक व १०० शिक्षक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीच्या सभापती रवीना गावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, पं. स. उपसभापती सोनाली कंकडालवार, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालूरकर, नंदा दुर्गे, पं. स. सदस्य सुखदेव दुर्योधन, आत्माराम गद्देकार, माजी सभापती मंदा गावडे, सुनीता मंथनवार, यमुना आत्राम, ऋषी पोरतेट, किशोर सुनतकर, अजय सोनलवार उपस्थित होते.
शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना तसेच इतर सामाजिक संघटनेच्यावतीने ना. आत्राम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पाहाराने सत्कार करण्यात आला. क्रीडा संमेलनाची सुरूवात आत्राम यांच्या हस्ते सरस्वती पूजन, क्रीडा ध्वजरोहण, क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाली. कार्यक्रमाला तहसीलदार कुणारपवार, संवर्ग विकास अधिकारी चांदेकर, भाजप महिला प्रदेश आघाडीच्या रहिमा सिद्धीकी, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, नाविसचे प्रकाश गुडेल्लीवार, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व केंद्रातील शिक्षक तसेच पंचांनी योग्य कामगिरी बजावून सहकार्य करावे, कुठलीही आक्षेपाची भावना न ठेवता परस्परांना क्रीडा भावनेने सामावून घ्यावे, असे आवाहन अजय कंकडालवार यांनी उपस्थितांना केले.
क्रीडा संमेलनाचे प्रास्ताविक व आभार गटशिक्षणाधिकारी व्ही. जे. गिऱ्हे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stadium in front of you