शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: January 4, 2015 23:10 IST

सुरक्षेची हमी देणारा प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून गडचिरोली आगाराच्या अनेक बसगाड्या शैक्षणिक सहलीकरीता

बसगाड्या व वाहक कमी असल्याचा परिणाम : तास-दीड तास उशिरा पोहोचत आहेत बसगाड्या
गडचिरोली : सुरक्षेची हमी देणारा प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून गडचिरोली आगाराच्या अनेक बसगाड्या शैक्षणिक सहलीकरीता बुकींग होत आहेत. तसेच वाहकाच्या कमतरतेमुळे एक ते दीड तास बसगाड्या उशीरा पोहोचत आहे. एसटीचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
महामंडळाच्या गडचिरोली आगाराकडे एकूण १०७ बसगाड्या आहेत. या आगाराचे दैनंदिन १०६ शेड्युल आहेत. सद्य:स्थितीत गडचिरोली आगाराच्या बस वाहतूक व्यवस्थेकरीता २३० चालक व २०७ वाहक आहेत. यापैकी चार ते पाच वाहक निलंबित करण्यात आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर नाहीत. तर चार ते पाच चालक व वाहक दिर्घ आजाराच्या रजेवर आहेत. याशिवाय दररोज २० ते २२ चालक वाहक साप्ताहिक विश्रांती असतात. गडचिरोली आगाराकडे दैनंदिन शेड्यूलच्या अनुषंगाने चालकाची संख्या पुरेशी आहे. तर ३० ते ३५ वाहकांची रोजच कमतरता भासते. हिवाळा असल्याने शैक्षणिक सहलीचा उपक्रम जोमात सुरू आहे. याकरीता गडचिरोली आगाराच्या अनेक बसेस अधिग्रहीत केल्या जातात. २० डिसेंबरला ४, २१ डिसेंबरला ४, २२ डिसेंबरला ४, २३ डिसेंबरला ५, २४ डिसेंबरला ८, २५ डिसेंबरला ३, २६ डिसेंबरला ५, २७ डिसेंबरला २, २८ डिसेंबरला ३, ३० डिसेंबरला ४, २ जानेवारीला ३ व ३ जानेवारीला ३ बसेस बुकींग करण्यात आल्या होत्या. तर उद्या ५ जानेवारीला ३ बसेस शैक्षणिक सहलीसाठी बुकींग करण्यात आल्या आहेत. भौगोलिक वाहतुकीचे क्षेत्र अधिक असून दैनंदिन शेड्युल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या तुलनेत गडचिरोली आगाराकडे बसगाड्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे आगार व्यवस्थापकाला काही दैनंदिन शेड्यूल रद्द करावे लागतात. चालकांच्या कमतरतेमुळे बसगाड्या वेळेवर सोडण्यासाठी तसेच पोहोचण्यासाठी उशीर होतो. मानव विकास मिशनच्या गडचिरोली आगाराकडे एकूण ३५ बसगाड्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून या बसगाड्यांची वेगमर्यादा बांधून देण्यात आली आहे. सध्या या बसगाड्या ४५ ते ५० या वेग मर्यादेत धावत आहेत. त्यामुळे सदर बसेस पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)