शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

दिवाळी सुट्यांमध्ये विशेष गृहपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM

धानोरा तालुक्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध कृतींमधून अध्ययन व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा, सदर गृहपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याचे शाळास्तरावर जतन करावे तसेच पंचायत समिती व कैैवल्य एज्युकेश फाऊंडेशनच्या पर्यवेक्षीय यंत्रणेने भेट दिल्यानंतर सदर उपक्रमांचे दस्तावेज शाळांनी उपलब्ध करावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमखांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देधानोरा तालुका : गणित, मराठी, इंग्रजी विषयातील संबोधांच्या स्पष्टीकरणासाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : दिवाळीच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, अध्ययनातील सातत्य टिकून राहावे, यासाठी धानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तसेच कैैवल्य एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने गृहपाठ देण्यात आला आहे. दिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थी गणित, मराठी, इंग्रजी विषयातील विविध संबोधांचे स्पष्टीकरण शिकणार आहेत.धानोरा तालुक्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध कृतींमधून अध्ययन व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा, सदर गृहपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याचे शाळास्तरावर जतन करावे तसेच पंचायत समिती व कैैवल्य एज्युकेश फाऊंडेशनच्या पर्यवेक्षीय यंत्रणेने भेट दिल्यानंतर सदर उपक्रमांचे दस्तावेज शाळांनी उपलब्ध करावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमखांना दिल्या आहेत.या माध्यमातून तालुक्यातील जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सातत्त्य व नियमितता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक केले जात आहे.या संबोधांवर राहणार अधिक भरदिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, मराठी व इंग्रजी विषयावरील विविध संबोध स्पष्ट करण्याबाबत गृहपाठ देण्यात आला आहे. यामध्ये गणित विषयातील १ ते १०० पर्यंतच्या संख्या अंकात व अक्षरात लिहिणे, दररोज दोन ते २० पर्यंतचे पाढे लिहिणे, दररोज बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आदींची प्रत्येकी पाच उदाहरणे सोडविणे. मराठी विषयासाठी दररोज अ ते ज्ञ पर्यंत बाराखडी लिहिणे, दररोज समानार्थी, विरोधार्थी, जोडाक्षरे प्रत्येकी पाच शब्द लिहिणे व वाचने, तसेच पाच ओळी शुद्धलेखन करून वाचणे. इंग्रजी विषयासाठी दररोज ए ते झेड पर्यंतचे अक्षर वाचणे व लिहिणे, पाच इंग्रजी शब्द वाचणे, विविध विषयावर दररोज पाच ओळी इंग्रली लेखन करून वाचणे, दररोज एक गोष्ट वाचणे, पाच ओळी शुद्धलेखन करणे.

टॅग्स :Schoolशाळा