शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने हिरावला दिवाळीचा आनंद

By admin | Updated: October 26, 2014 22:41 IST

सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे.

गडचिरोली : सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने रोवलेले धानपिक हातात येईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतमजूर व अल्प भूधारक शेतकरी मजुरी करूनच जीवन जगतात. येथील मजुरांना धानपिकाच्या रोवणीपासून ते धानपिकाचे निंदन काढेपर्यंत गावातच रोजगार उपलब्ध होतो. निंदनाची कामे झाल्यानंतर धान कापणीदरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीत धानपिकासंबंधित विशेष कामे राहत नसल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीन पिकाची दसऱ्याच्या आठ दिवसांपूर्वीच कापणी पूर्ण होते. हा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षीमात्र उशिरा पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाच्या पेरणीला उशिर झाला. परिणामी सोयाबीन पीक उशिरा परिपक्व झाले. त्याचबरोबर यावर्षी दिवाळीचा सण १५ दिवसांनी अगोदर आला आहे. यावर्षी दिवाळी सणाच्या जेमतेम चार दिवसांपूर्वीच कापणीला सुरूवात झाली. सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजुरांनी आठ दिवसांपूर्वीच घरून निघाले होते. मध्यंतरी दिवाळीचा सण आला. मात्र केवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी हजारो रूपये खर्च करून तसेच दिवसाची मजुरी बुडवून येणे शक्य नसल्याने यावर्षी मजूर परतलेच नाही. संपूर्ण जग दिवाळीचा आनंद साजरा करत असतांना मजुरांना मात्र वावरात सोयाबीन कापनीचे कष्ट उपसावे लागत होते. दिवाळी सणासाठी पैसाही उपलब्ध नसल्याने घरी असलेल्या व्यक्तींना उधारवाडी आणूनच दिवाळीचा सण साजरा करावा लागला. सोयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर एकराप्रमाणे सोयाबीन कापणीचा हुंडा घेऊन काम करतात. सकाळीच कामाला सुरूवात करून रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोयाबीन कापणे व जमा करण्याचे काम करीत असल्याने दिवसाकाठी ५०० ते ६०० रूपये मजुरी पडते. २० दिवस चालणाऱ्या या कामातून ८ ते १० हजार रूपये कमाई होते. ऐवढे उत्पन्न दोन एकर धानाची शेती केल्यानंतरही होत नाही. त्यामुळे मजूर सोयाबीन पिकाच्या कापणीचा हंगाम कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. रोजगाराच्या साधनाअभावी येथील शेतमजुराला दिवाळीच्या आनंदापेक्षा पोट भरण्याची चिंता सर्वाधिक राहते. त्यामुळे सोयाबीन कापणीचा हंगाम सोडणे या मजुरांना अशक्य होते. गावातील जवळपास ५० टक्के शेतमजूर सोयाबीन कापणीसाठी गेली असल्याने गावकऱ्यांनाही दिवाळीचा आनंद पाहिजे त्या प्रमाणात लुटता आला नाही. मजुरीसाठी दहाही दीशा वनवन भटकण्याची येथील मजुरांना सवयच झाली आहे. पावसाळ्यादरम्यानही चंद्रपूर जिल्ह्यात धानाची रोवणी करण्यासाठी हजारो मजूर जातात. धानपिकाची रोवणीदरम्यान कधीकधी पोळ्याचा सण येत असल्याने हा सणसुद्धा दुसऱ्यागावी साजरा करावा लागतो. मात्र पोटासाठी मन मारून हे सर्व कष्ट उपसावेच लागतात. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन नसल्याने वनवन भटकण्याशिवाय मजुरांसमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. सणाचा आनंद घेतो म्हटला तर कुटुंबाचे पोट उपाशी राहण्याची पाळी येते. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)