शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

चामाेर्शी तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर आवत्या पद्धतीने पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

शेतकरी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत होते. रोवणीसाठी लागणारा मशागतीचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेताची नांगरणी, वखरणी करीत. यासाठी गावागावांत जनावरे दिसून यायची. मात्र, गेल्या दहा वर्षांत बैलजोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत  झाली. जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना कठीण जात होते. तसेच जनावरांच्या किमती वाढत चालल्याने शेतकऱ्यांना बैलजोडी वापरणे कठीण झाले.

ठळक मुद्देपीक जाेमात : राेवणीचा खर्च टाळण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी शेतकरी रोवणी व आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करतात. दिवसेंदिवस धान लागवड खर्च वाढत असल्याने रोवण्याच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी यावर्षी जवळपास ६० टक्के आवत्या पद्धतीने धानाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
शेतकरी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत होते. रोवणीसाठी लागणारा मशागतीचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेताची नांगरणी, वखरणी करीत. यासाठी गावागावांत जनावरे दिसून यायची. मात्र, गेल्या दहा वर्षांत बैलजोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत  झाली. जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना कठीण जात होते. तसेच जनावरांच्या किमती वाढत चालल्याने शेतकऱ्यांना बैलजोडी वापरणे कठीण झाले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे दोन-तीन बैलजोड्या असायच्या ते शेतकरी बैलजोडीविना धानाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. बैलजोडीऐवजी शेतकरी ट्रॅक्टर खरेदीकडे वळले आहेत. ट्रॅक्टरला गावात हंगामी स्वरूपात रोजगार मिळू लागल्याने आजच्या घडीला साधारण गावातसुद्धा दहा-बारा ट्रॅक्टर सहज दिसून येतात.  त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील नांगरणी, वखरणी, चिखलणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. परंतु, इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टर भाडे ९०० ते १००० रुपये प्रति तासांवर पाेहाेचले. त्यामुळे रोवणी खर्चाची बचत करून धान पिकांचे उत्पादन घेता येते, ही बाब हेरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धान पिकाची लागवड केली आहे. 
किमान एक वर्ष आवत्या पद्धतीने धान पीक लागवड करून पाहू म्हणत शेतकरी आवत्या पद्धतीकडे वळले आहेत. सध्या आवत्या धान पीक जाेमात असल्याने शेतकरी आनंदित आहे.

शेतमजुरांची अडचण 
शेतातील धान रोवणी करण्यासाठी गावातील शेतमजूर रोवणी कामाकरिता पूर्वी आठवडा पद्धतीने धानाचा व पैशाचा  मोबदला देत असत. मात्र, आता यात बदल झाला असून रोवणी काम आता एकराप्रमाणे ठेका पद्धतीने मजूर करू लागले आहेत. रोवणी हंगाम किमान महिनाभर चालत असे. यातूनच एक मजूर साधारण दहा हजार रुपये सहज कमवीत असे. यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. मात्र, रोवणी क्षेत्र कमी झाल्याने शेतमजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती