गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:55+5:302021-03-25T04:34:55+5:30

गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहण व विद्यापीठाच्या बांधकाम व इतर समस्यांच्या निवारणार्थ आमदार डॉ. देवराव होळी ...

Solve the problems of Gondwana University | गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावा

गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावा

गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहण व विद्यापीठाच्या बांधकाम व इतर समस्यांच्या निवारणार्थ आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली व समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाच्या ७८.१७ हेक्टर जमिनीचे तातडीने भूसंपादन करावे, जमीन अधिग्रहण करता खर्च करण्यास मंजुरी दयावी, शैक्षणिक विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे ३६ कोटी रुपये मंजूर करावे, सांस्कृतिक भवन बांधकामकरिता ३० कोटी रुपये मंजूर करावे, खेलो इंडियाअंतर्गत हाल मंजूर करावे, विद्यापीठात असंख्य पदे रिक्त असून, ती भरण्यात यावीत, आवश्यक पदांना तातडीने मंजुरी देणे, यासह विद्यापीठांतर्गत जमीन अधिग्रहण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी विनंती केली. विद्यापीठाच्या विविध समस्यांबाबत आ. डाॅ. हाेळी यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सखाेल चर्चा केली.

Web Title: Solve the problems of Gondwana University