देसाईगंज तालुक्यातील समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:39+5:302021-01-14T04:30:39+5:30

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील समस्या साेडवाव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी यांनी पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ ...

Solve the problem in Desaiganj taluka | देसाईगंज तालुक्यातील समस्या साेडवा

देसाईगंज तालुक्यातील समस्या साेडवा

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील समस्या साेडवाव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी यांनी पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.काेराेनाच्या संकटामुळे जिल्ह्यात विविध विकासकामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे विकासकामे करणे आवश्यक आहे. देसाईगंज हे एकमेव रेल्वेस्थानक असल्याने सूरजागड प्रकल्प हा सूरजागडसह देसाईगंज तालुक्यात निर्माण करावा. देसाईगंजजवळ पशुसंवर्धन विभागाची १ हजार एकर जागा रिकामी पडली आहे. तेथे एमआयडीसी प्रकल्प उभारण्यात यावे. तेव्हाच स्थानिक युवकांना राेजगार प्राप्त हाेईल. देसाईगंज येथे रेव्हेन्यू नाेंदणी कार्यालय नाही. सदर कार्यालय आरमाेरी येथे असल्याने देसाईगंज तालुक्यातील नागरिकांना आरमाेरी येथे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे देसाईगंजात हे कार्यालय निर्माण करावे. देसाईगंजात बस डेपाे निर्माण करावा. नगरपरिषद हद्दीतील आरमाेरी मार्गालगत नैनपूर तलाव ५५ एकर जागेमध्ये आहे. या तलावाचे साैंदर्यीकरण करुन पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, आदी मागण्यांचा समावेश हाेता. तालुक्यातील मागण्यांसदर्भात आपल्या दालनात सभा घेऊन उपाययाेजना करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Web Title: Solve the problem in Desaiganj taluka