शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

फटाके विक्रीवर मंदीचे सावट

By admin | Updated: October 25, 2014 22:40 IST

दिवाळीत दरवर्षी देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांची विक्री व्हायची मात्र यावर्षी फटाके विक्रीवर मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची विक्री लाखांवर आली असल्याची माहिती

महेंद्र चचाणे - देसाईगंजदिवाळीत दरवर्षी देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांची विक्री व्हायची मात्र यावर्षी फटाके विक्रीवर मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची विक्री लाखांवर आली असल्याची माहिती फटाके विक्रेत्यांनी दिली. दिवाळी सण फटाके फोडून साजरा करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रूढ झाली आहे. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक दृष्टीने प्रगत शहर मानल्या जाते. जिल्हाभरातील नागरिक असंख्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी देसाईगंज बाजारपेठेत येतात. दिवाळीच्या दरम्यान कपडे, दागिणे, फराळ आदी वस्तूंसोबतच फटाक्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. ग्रामीण भागातील लहान दुकानदार देसाईगंज येथूनच फटाक्यांची खरेदी करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही दुकानदार फटाके खरेदीसाठी देसाईगंज बाजारपेठेलाच पसंती दर्शवितात. दरवर्षी जवळपास सव्वा ते दीड कोटींचे फटाके विकल्या जात होते. एका फटाके विक्रेत्याचा गल्ला जवळपास ५ ते ७ लाख रूपयांच्या दरम्यान राहत होता. यावर्षी मात्र फटाक्यांच्या विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली असल्याची माहिती फटाके दुकानदारांनी दिली आहे. इतर वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी महत्त्वाचे म्हणजे फटाक्यांच्या किमतीमध्ये यावर्षी वाढ झाली नाही. तरीही एकूण विक्री ५० लाखाच्या जवळपासही पोहोचली नाही. कित्येक दुकानदारांना मुद्दलावरच व्यवसाय करावा लागला. अनेक दुकानदारांकडे माल शिल्लक असल्याने त्या दुकानदारांना तोट्याचा सामनाही करावा लागला आहे. काही दुकानदारांनी लाख रूपयांपर्यंतचा गल्ला जमा केला. तर काहींना मात्र ५० हजार रूपयांच्या विक्रीवरच समाधान मानावे लागले आहे. यावर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी सामाजिक संस्था, शाळा यांच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना फटाके फोडण्याचे होणारे शारीरिक दुष्परिणाम व पर्यावरणाची होणारी हानी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे अपघातही विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. काही सामाजिक व धार्मिक संस्थांनी तर दिवाळीदरम्यान फटाके फोडणे हे कोणत्याही शास्त्रात नाही. ही पाश्चिमात्य पद्धत आहे, अशीही टीका करण्यात आली होती. यामुळे काही मिनिटांच्या आनंदासाठी हजारो रूपये खर्च होण्याबरोबरच पर्यावरणाचे प्रदूषणही होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. दिवाळीचा आनंद वेगळ्यापद्धतीनेही साजरा करता येतो. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानेच फटाक्यांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली असवी, असा अंदाज दुकानदारांकडून व्यक्त केला जात आहे. विक्री कमी झाल्यामुळे फटाका दुकानदारांमध्ये नाराजी पसरली असली तरी जिल्ह्यातील पर्यावरणवाद्यांनी मात्र फटाक्यांच्या नियंत्रित वापरावर समाधान व्यक्त केला आहे.