शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार

By admin | Updated: October 13, 2014 23:21 IST

परिसरातील पशुधनाची काळजी घेता यावी यासाठी रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे दिसून येते.

देवराव कुनघाडकर - रांगीपरिसरातील पशुधनाची काळजी घेता यावी यासाठी रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. निरंजनशहा महाराज काटेंगे हे जिल्हा परिषद सदस्य असतांना शासनाकडे पाठपुरावा करून पशुवैद्यकीय दवाखाना रांगी येथे मंजूर करून आणला. प्रथम हा दवाखाना हरिजी मडावी माध्यमिक विद्यालयाच्या बाजूला होता. त्यानंतर दवाखान्याकरिता स्वतंत्र्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे रितसर उद्घाटन होण्यापूर्वीच दवाखाना थाटण्यात आला. अगदी काही दिवसांतच इमारतीची दुर्दशा झाली आहे. दरवाजाचे प्लायवूड निघाले आहेत. काही ठिकाणी भिंतीला छिद्र पडले आहेत. तावदाने तुटली आहेत. स्लॅबचे बांधकाम योग्य नसल्याने पावसाळ्यात इमारत गळते. इमारतीची अवस्था अत्यंत वाईट असतांनाही अभियंत्याने कशी काय पास केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दवाखान्यात पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व शिपाई अशी तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात शिपाईच पूर्ण काम करतांना दिसून येतो. पशुधन अधिकाऱ्याचा प्रभार मागील तीन वर्षांपासून गोडलवाहीचे पशुधन अधिकारी गोस्वामी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र ते रांगीला कधी येतात व कधी जातात याचा पत्ताच लागत नाही. गोडलवाही ते रांगी यांच्यामध्ये १०० किलोमिटरचे अंतर आहे. एवढ्या दुरच्या अधिकाऱ्याकडे कसा काय प्रभार सोपविण्यात आला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. रांगी परिसरातील पशुधनाची संख्या लक्षात घेता याठिकाणी स्वतंत्र पशुधन विकास अधिकारी नेमणे आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भिकुंडी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र तेही रूजू न होता. एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेले होते. ते आता रूजू झाले आहेत. आतातरी त्यांनी चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.