शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शहिदाचे कुटुंबीय सानुग्रह अनुदानापासून वंचित

By admin | Updated: December 30, 2016 01:56 IST

भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे

पत्रकार परिषद : प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा शहीद जवानाच्या पित्याचा आरोप गडचिरोली : भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप शहीद जवानाचे पिता दादाजी चहांदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र शहीद भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबीयाला अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नाही. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्र व्यवहार व निवेदने सादर करण्यात आली. मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते यांनाही मागील वर्षी निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. क्रिष्णा गजबे, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करून चहांद कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मात्र दिलेल्या निवेदनांना शासनदरबारी केराची टोपली दाखविण्यात आली काय, असा सवालही दादाजी चहांदे यांनी केला आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळावे, याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी शासनाकडे पत्र पाठवून २०१४-१५ या वर्षात सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. परंतु शासन अधिकाऱ्यांच्या पत्राचा विचार करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाविषयी शहीद जवानाच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाला वारंवार पाठविलेल्या निवेदनांचे काय झाले? असा सवाल करीत शासनाने शहीद जवानाचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणीही दादाजी चहांदे यांनी केली. (प्रतिनिधी)