शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पत्राने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

By admin | Updated: July 27, 2014 00:06 IST

प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाचा बनावट लेटर हेड बनवून सदर पत्र व्हॉटस्अ‍ॅपने राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य

शिक्षण संचालक : व्हॉटस्अ‍ॅपवरून झाली धमालगडचिरोली : प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाचा बनावट लेटर हेड बनवून सदर पत्र व्हॉटस्अ‍ॅपने राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. हा प्रकार माहित झाल्यानंतर अधिकारी व शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांची सही असलेला १९ जुलै २०१४ चे पत्र व्हॉटस्अ‍ॅपने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या पत्रामध्ये ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येवर जिल्ह्यातील एकूण मंजूर पदसंख्ये एवढी पदे कार्यरत मुख्याध्यापकांमधून बिंदू नामावलीनुसार सेवाज्येष्ठतेच्या आधारे समुपदेशनाने समायोजित करावे आदी निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. वास्तविक १९ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी असे कोणतेही पत्र पाठविले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दलची तक्रारही पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी स्पष्ट केले आहे. सदर बनावट पत्र तयार करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. (नगर प्रतिनिधी)