शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्राकडून बोगस बियाण्यांची विक्री

By admin | Updated: June 29, 2015 01:56 IST

जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करतात.

कारवाई करा : पोलीस ठाण्यात तक्रारदेसाईगंज : जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करतात. असाच काहीसा प्रकार देसाईगंज शहरात उजेडात आला आहे. या संदर्भात विर्शी वार्डातील शेतकरी कमलाकर रामकृष्ण राऊत यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात कमलाकर राऊत यांनी रविवारी देसाईगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.कमलाकर राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मोनिका चंद्रशेखर वाघमारे यांच्या परवानाप्राप्त देसाईगंज शहरातील पारस कृषी केंद्रातून उन्हाळी धान पिकासाठी ४ हजार ८० रूपये किमतीचे ओम श्रीराम जातीचे सहा बॅग बियाणे खरेदी केले. या बियाण्यांची धान पेरणी झाल्यापासून १२५ दिवसांच्या आत उत्पन्न निघण्याची हमी संबंधित कृषी केंद्र संचालकाने दिली होती. मात्र १२५ दिवसांचा कालावधी उलटूनही धानाचे उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे १.४६ हेक्टर आर शेत जमिनीतील धान पिकाचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. संबंधित कृषी केंद्र संचालकाने आपली फसवणू केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कमलाकर राऊत याने पोलीस तक्रारीतून केली आहे. (वार्ताहर)कृषी केंद्र संचालकाने बियाणे विक्रीच्या वेळी धान पिकाच्या उत्पादनाच्या कालावधीची हमी दिली होती. मात्र विहित कालावधीत उत्पादन हाती न आल्याने आपण कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या धान पिकाच्या शेतीचा पंचनामाही केला. मात्र संबंधित कृषी केंद्र संचालकावर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही शेतकरी कमलाकर राऊत यांनी म्हटले आहे.