शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू व वांझ हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

काेराेना साथ राेखण्यासाठी लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. ...

काेराेना साथ राेखण्यासाठी लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अनेक नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवक, तलाठी, आराेग्य सेवक यांच्यामार्फत गावातील प्रत्येक लाभार्थ्याच्या नावाची यादी बनवून प्रत्यक्ष घरी जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही काेही नागरिकांच्या मनातून अफवांचे भूत जात नसल्याने लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. अफवांचे पीक प्रामुख्याने दुर्गम भागात अधिक असल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स

काय आहेत अफवा?

वांझपणा येतो

काेराेनाची लस घेतल्यास पुरुष असाे की महिला, त्याला भविष्यात मूल हाेत नाही. एखादा नवयुवक लस घेण्यास तयार झाला तरी त्याच्या घरचे इतर वयस्क सदस्य त्याला लस घेऊ देत नाहीत. अविवाहित मुलींना तर लसीकरणासाठी प्रतिबंधच घातला जात आहे.

काेराेनाची टेस्ट केली जाते

लस देण्यापूर्वी काेराेना चाचणी केली जाते. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला जवळच्या काेविड केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात भरती केले जाते, अशी अफवा आहे.

शरीर कमजाेर हाेेते

काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. हे शरीर कमजाेर हाेण्याची लक्षणे आहेत. शरीरात अनेक बदल घडून येतात. हाडे दुखण्याचा त्रास सुरू हाेतो, अशी अफवा आहे.

गावकरी काय म्हणतात?

काेराेना लसीबाबत नागरिक सांगतात ते खरे मानायचे की कर्मचारी सांगतात ते खरे मानायचे, असा प्रश्न आहे. आमच्या गावातच दवाखान्यात लसीकरण केंद्र आहे. मात्र, आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने लस घेतली नाही. कर्मचारी सांगत आहेत. तर लस घेण्याचा विचार सुरू आहे.

-गावकरी

नागरिकांमध्ये याेग्य ती जागृती करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, हे कर्मचारी काेराेनाच्या नावाखाली गावात येतच नाहीत. केवळ आराेग्य कर्मचारी लसीकरणाचा डबा धरून येतात. मात्र, नागरिक लसीकरणासाठी येत नाहीत. काही निवडक नागरिक येतात. त्यांना लस दिली जाते. त्यामुळेेच अनेक गावांमध्ये २५ टक्के नागरिकांचेसुद्धा लसीकरण झालेले नाही.

-संदीप कुळमेथे, नागरिक

बाॅक्स

आतापर्यंत झालेले लसीकरण

लस घेणारे पहिला डाेस दुसरा डाेस एकूण

आराेग्य कर्मचारी ८७२६ ६७५३

फ्रंटलाइन वर्कर २१०४८ ११३२४

ज्येष्ठ नागरिक ३२५६१ ७४०८

४५ ते ६० वयाेगट ४४११४ ८५०३

१८ ते ४४ ८२६२ १

एकूण १,१४,७११ ३३,९८९