शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दोन विभागांच्या वादात रस्त्याची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

ठाणेगाव ते रांगी या रस्ता दुरुस्तीच्या कामाची ई निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा यांच्याकडून काढण्यात आली. या राज्यमार्गाचे काम ...

ठाणेगाव ते रांगी या रस्ता दुरुस्तीच्या कामाची ई निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा यांच्याकडून काढण्यात आली. या राज्यमार्गाचे काम धानोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने ठाणेगाव-वैरागडदरम्यानचा रस्ता आरमोरी बांधकाम विभागाचा असला तरी सध्या त्याची दुरुस्ती धानोरा बांधकाम विभागाने करायची आहे, असे आरमोरी येथील उपविभागीय अभियंत्याचे म्हणणे आहे.

वैरागड-ठाणेगाव या मार्गाने छत्तीसगड-आंध्र प्रदेश अशी आंतरराज्य वाहतूक चालत असल्याने नेहमीच जड वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. पुन्हा धानाेरा, आरमोरी बांधकाम विभागाच्या वादात किती जीव घेतले जातील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बॉक्स

स्वखर्चाने खड्डे बुजविले

वैरागड - ठाणेगावदरम्यान वैरागडपासून १ कि.मी. अंतरावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झाले. याबाबत वारंवार आरमोरी बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, निष्क्रिय आरमोरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. शेवटी जि.प. सदस्य संपत आडे यांनी स्वखर्चाने हा खड्डा बुजविला.

===Photopath===

120421\12gad_17_12042021_30.jpg

===Caption===

वैरागड - ठाणेगाव दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरावस्था