शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील व्यवहारांवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

राज्यातच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २४० वर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू नये म्हणून जास्तीत जास्त आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’नुसार कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून १५ मार्च ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनवीन नियमावली लागू, शासकीय व खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुन्हा झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी दैनंदिन व्यवहारांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय / खासगी कार्यालयांत ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. याशिवाय लग्न समारंभासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही.राज्यातच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २४० वर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू नये म्हणून जास्तीत जास्त आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’नुसार कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून १५ मार्च ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.सर्व धार्मिक संस्थांना किती भाविकांना एका तासात धार्मिक स्थळांना भेट देता येईल याची आकडेवारी जाहीर करून, उचित खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.या आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपासून नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई कमी झाली आहे. आता पुन्हा कारवाया वाढतील.

या बाबींना आल्या मर्यादा सर्व सिनेमागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेत चालू राहतील. मास्क घातल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश नसणार आहे. प्रत्येक ग्राहकाचे, व्यक्तीचे तापमान मोजण्यात येणार आहे. तापमान  १००.६ फॅ. किंवा ९८.६ सेल्सिअस पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीस प्रवेश नसेल, हँड सॅनिटायझर प्रवेशद्वारावर व उचित  ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.

 संबंधित आस्थापनांनी मास्क व सुरक्षित अंतराचे पालन व्हावे म्हणून आवश्यक कर्मचारीवर्ग नेमावेत. सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. अंत्यविधीकरिता जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी राहील.

गृहविलगीकरणात राहणार बंधने गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीने आपली माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १४ दिवस गृहभेट दिली जाणार आहे. गृहविलगीकरणाचा स्टीकर संबंधित कोविड सकारात्मक रुग्णाच्या घरी चिकटवला जाणार आहे. संबंधित व्यक्तींच्या घरातील लोकांच्या हालचालींवर निर्बंध राहतील. या बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना कोविड केअर सेंटरला हलविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या