शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निर्बंध हटणार, पण थोडे थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

राज्य शासनाने आठवडाभरापूर्वी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत गडचिरोली रेड झोनमध्ये होते. पण त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे हा जिल्हा रेड झोनमधून बाहेर आलेला आहे. आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याबाबतचे सविस्तर दिशानिर्देश अधिसूचनेद्वारे जारी केले जातील. त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करावयाचे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

ठळक मुद्देशासनाच्या स्पष्ट दिशानिर्देशानंतर निर्णय, म्युकरमायकोसिसचे २ रुग्ण दगावले, चौघांवर उपचार सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात असला तरी अजून पूर्णपणे थोपविण्यात यश आलेले नाही. त्यात म्युकरमायकोसिसचेही रुग्ण जिल्ह्यात आढळले. त्यापैकी दोघांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा स्थितीत राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध हटवायचे किंवा नाही, याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. त्यासाठी थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य शासनाने आठवडाभरापूर्वी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत गडचिरोली रेड झोनमध्ये होते. पण त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे हा जिल्हा रेड झोनमधून बाहेर आलेला आहे. आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याबाबतचे सविस्तर दिशानिर्देश अधिसूचनेद्वारे जारी केले जातील. त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करावयाचे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष त्यासाठी ठरविण्यात आले आहेत.  

म्युकरमायकोसिसच्या ७ रुग्णांचे निदानजिल्ह्यातील संशयित म्युकरमायकोसिसच्या ४ रुग्णांना नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातील नागपूर येथे उपचार घेणारे दोन जण दगावले. गडचिरोली शहरातील एका ५८ वर्षीय रुग्णाने म्युकरमायकोसिसवर मात केली. दोन जण चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर दोघे नागपूर येथे उपचार घेत आहेत. मृतांपैकी एक जण कोरची येथील ५० वर्षीय पुरुष आणि दुसरा चामोर्शी तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष आहे.

एका मृत्यूसह ३८ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर ३८ नवीन बाधित आढळून आले. याचवेळी १४१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ५८७ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. नवीन मृत्यूमध्ये कमलापूर येथील ८० वर्षीय महिला आहे. 

नवीन ३८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५, आरमोरी ४, भामरागड तालुक्यातील २, चामोर्शी तालुक्यातील ७, धानोरा तालुक्यातील ६, एटापल्ली तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील ८, सिरोंचा तालुक्यातील ७ तर देसाईगंज तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे. 

कोरोनामुक्त झालेल्या १४१ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३७, अहेरी २५,  आरमोरी ५, चामोर्शी ३०, धानोरा ६, एटापल्ली ९, मुलचेरा ७, सिरोंचा ११, कोरची २, कुरखेडा ५ तसेच देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या