११ सीआरपीएफ जवानांसह १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:01:08+5:30

लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रविवारी एकाच दिवशी २३ सीआरपीएफ जवानांसह ४१ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

Reports of 14 persons including 11 CRPF personnel are positive | ११ सीआरपीएफ जवानांसह १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

११ सीआरपीएफ जवानांसह १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ४६ जवानांना लागण : कर्तव्यावर परत येताना बाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक कृषी महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात असलेल्या सीआरपीएफ ११३ बटालियनच्या नऊ तर अहेरी येथील सीआरपीएफच्या दोन व तीन सामान्य नागरिकांचे गुरूवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३९ झाली आहे. सोबतच नऊ जिल्ह्याबाहेर नोंद झाले आहेत. असे एकूण १४८ रूग्ण झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रविवारी एकाच दिवशी २३ सीआरपीएफ जवानांसह ४१ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ६ जुलै रोजी पुन्हा चार सीआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. ७ जुले रोजी पाच, ८ जुलै रोजी तीन व ९ जुलै रोजी पुन्हा ११ सीआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत एकूण ४६ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याने सीआरपीएफ जवानांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाबाधीत आढळून आलेल्या सर्वच जवानांना क्वॉरंटाईन ठेवले असल्याने त्यांचा संसर्ग इतरांना होण्याचा धोका टळला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना सक्रीय बाधितांची संख्या ७४ झाली आहे. आतापर्यंत ६५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. ८२ रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ९ जिल्ह्याबाहेरील आहेत. इतर नागरिकांमध्ये एक ३२ वर्षीय शासकीय कर्मचारी असून तो नांदेड येथून रूजू होण्यासाठी आला होता. त्याला अहेरी येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. इतर दोन रूग्ण गडचिरोली येथील विलगीकरण कक्षात होते. त्यापैकी एक रूग्ण गुजरात येथून परत आलेली ६५ वर्षीय महिला आहे. तर दुसरा २७ वर्षीय युवक असून तो मुंबई येथून परतला आहे. हे दोघेही समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

छल्लेवाडा गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषित
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील छल्लेवाडा येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे अहेरी तहसीलदारांनी ९ जुलै रोजी छल्लेवाडा गावातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

१,१०६ नागरिक विलगीकरणात
जिल्हाभरातील विलगीकरण कक्षात १ हजार १०६ नागरिक होते. आजपर्यंत ८ हजार ४६० नागरिकांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ७ हजार ९४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. ५१२ नमुन्यांचा अहवाल शिल्लक आहे.

Web Title: Reports of 14 persons including 11 CRPF personnel are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.