शिक्षकांची बदली करा : शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर

By Admin | Updated: July 9, 2015 01:50 IST2015-07-09T01:50:21+5:302015-07-09T01:50:21+5:30

नवरगाव येथील पहिली ते पाचवीच्या जि. प. प्राथमिक शाळेमधील दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात

Replace teachers: An issue with the teacher is not staying in the headquarters | शिक्षकांची बदली करा : शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर

शिक्षकांची बदली करा : शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर

कोरची : नवरगाव येथील पहिली ते पाचवीच्या जि. प. प्राथमिक शाळेमधील दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात याशिवाय बऱ्याचदा ते उशिरा शाळेमध्ये येतात तर कधी कधी शाळेत येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी अखेर बुधवारी नवरगाव जि. प. शाळेला कुलूप ठोकले.
नवरगाव येथील पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळेमध्ये एकूण ३६ विद्यार्थी पटसंख्या आहे. या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सी. एम. काटेखाये व सहाय्यक शिक्षक जी. डी. सहारे हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या गावी मुख्यालयी राहून शिक्षणाचे कार्य करावे, असा शासकीय दंडक आहे. मात्र या शाळेतील सदर दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयी वास्तव्यास राहून तेथून नवरगावच्या शाळेत ये-जा करतात. त्यामुळे त्यांचे या शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नवरगाव शाळेतील मुख्याध्यापिका काटेखाये व सहाय्यक शिक्षक सहारे यांची इतर शाळेत बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षक बदलीच्या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी बुधवारी नवरगाव शाळेला कुलूप ठोकले. आंदोलन सुरू असताना शिक्षक ११.३० वाजता नवरगावात पोहोचले होते. यावेळी आंदोलनात सभापती अवधराम बागमुळ, बरातू ठेला, कनसराम काटेंगे, श्यामकुवर यादव, महेश बखर, सुकलू काटेंगे, सीमा काटेंगे, रामलाल भुतबिलई, अंतकला कल्लो, कौशिला होळी, अमाय काटेंगे, पवित्रा भैसारे, घुमूळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Replace teachers: An issue with the teacher is not staying in the headquarters