PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:09 IST2026-05-14T19:09:16+5:302026-05-14T19:09:43+5:30

मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Nitin Gadkari also responded to PM Modi's appeal, inspected the Palkhi highway works while traveling by bus | PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...

PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...

 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. दौरा सुरू असतानाच ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे कडक आदेश संबंधित यंत्रणेला दिले.

दरम्यान, गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. याचवेळी गडकरी यांनी माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पुरातन विहिर व पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीची पाहणी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील  करण्यात आले. 

यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री  गडकरी म्हणाले,  तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.  या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सद्या पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील.  पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेल्या नाहीत त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title : मोदी की अपील पर गडकरी की प्रतिक्रिया, बस से पालकी मार्ग का निरीक्षण

Web Summary : पीएम मोदी की अपील के बाद, नितिन गडकरी ने बस से संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग निर्माण का निरीक्षण किया। उन्होंने काफिले के वाहनों को कम करने का आदेश दिया। पालकी राजमार्ग का अस्सी प्रतिशत काम पूरा हो चुका है, शेष जल्द ही पूरा किया जाएगा। उन्होंने प्राचीन कुओं का भी निरीक्षण किया।

Web Title : Gadkari responds to Modi's appeal, inspects Palkhi road by bus.

Web Summary : Following PM Modi's appeal, Nitin Gadkari inspected the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi road construction by bus. He ordered reducing convoy vehicles. Eighty percent of the Palkhi highway work is complete, with the remainder to be finished soon. He also inspected ancient wells.