सोनापूर ते नवग्राम मुख्य रस्त्याची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:39+5:302021-05-12T04:38:39+5:30

तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालगत येत असलेल्या सोनापूर, मारोडा व नवग्रह या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. ...

Repair the main road from Sonapur to Navgram | सोनापूर ते नवग्राम मुख्य रस्त्याची दुरुस्ती करा

सोनापूर ते नवग्राम मुख्य रस्त्याची दुरुस्ती करा

तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालगत येत असलेल्या सोनापूर, मारोडा व नवग्रह या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने परिसरातील नागरिकांना आवागमन करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती.

मागील काही अनेक महिन्यांपासून खड्ड्यांच्या त्रासामुळे दुचाकी, चारचाकी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता चामोर्शी तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने शाळकरी मुलांनाही ये-जा करावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन मंजूर झालेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सरपंच गोपिका टेकाम, उपसरपंच शेषराव कोहळे, ग्रा. पं. सदस्य अनिल उंदीरवाडे,उत्तम कोवे, संदीप सोयाम, सविता कुनघाडकर, कल्पना सिडाम, उषा चलाख यांनी केली आहे.

Web Title: Repair the main road from Sonapur to Navgram