नाेंदणी १० हजार आराेग्य कर्मचाऱ्यांची, डाेस उपलब्ध १२ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:17+5:302021-01-16T04:40:17+5:30

बाॅक्स... २८ दिवसानंतर दुसरा डाेस लससाठी ९ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्याला १२ हजार ...

Registration of 10 thousand health workers, 12 thousand available | नाेंदणी १० हजार आराेग्य कर्मचाऱ्यांची, डाेस उपलब्ध १२ हजार

नाेंदणी १० हजार आराेग्य कर्मचाऱ्यांची, डाेस उपलब्ध १२ हजार

बाॅक्स...

२८ दिवसानंतर दुसरा डाेस

लससाठी ९ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्याला १२ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक आराेग्य कर्मचाऱ्यासाठी दाेन लस द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या लस सर्वप्रथम सहा हजार कर्मचाऱ्यांना दिल्या जातील. उर्वरित सहा हजार लस याच कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतरच्या अंतरानंतर दिल्या जातील. त्यामुळे ३ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काेट...

पहिल्या टप्प्यात सहा हजार आराेग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लवकरच लस उपलब्ध हाेईल. एका दिवशी पाच ठिकाणी ५०० लस देण्याचे नियाेजन आहे. यात हळूहळू वाढ केली जाणार आहे.

- डाॅ.शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली

बाॅक्स.....

काेराेना ग्राफी

एकूण रुग्ण

९२३९

.......................

नाेंदणी केलेले आराेग्य सेवक

९९६६

......................

पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला उपलब्ध झालेले डाेस

१२०००

........................

किती लाेकांना मिळणार लस

६०००

Web Title: Registration of 10 thousand health workers, 12 thousand available