शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क जमीनधारकांकडील धानाची खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

गडचिरोली हा आदिवासी व जंगल व्याप्त जिल्हा असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन हक्क कायद्यानुसार जमिनीचा पट्टा मिळालेले शेतकरी आहेत. ...

गडचिरोली हा आदिवासी व जंगल व्याप्त जिल्हा असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन हक्क कायद्यानुसार जमिनीचा पट्टा मिळालेले शेतकरी आहेत. शासनाने धान खरेदीकरिता जमिनीचा ७/१२ आवश्यक केलेला आहे; परंतु वन हक्क जमिनीचा ऑनलाइन प्रक्रियेत ७/१२ उपलब्ध नसल्याने शासकीय धान खरेदी केंद्रावर वनजमीनधारक शेतकऱ्यांना सातबाराअभावी धान विक्री करण्यास अडचणी येत हाेत्या. आ. कृष्णा गजबे यांनी तहसील कार्यालय देसाईगंज येथे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली व तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मार्ग काढण्यासाठी सूचना केली होती. १४ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे आयोजित विधानसभा अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांची समस्या निदर्शनास आणून दिली. ना. भुजबळ यांनी निर्णय घेत जिल्हाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक मार्केटिंग फेडरेशन, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना १४ डिसेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार वनहक्क अधिनियम २००५ अन्वये वनांमधील जमिनी शेतकऱ्यांना दिलेल्या असल्यास त्याबाबतचे ८-अ प्रमाणपत्र मिळत नसल्याने अशा शेतकऱ्यांकडून नमुना ८-अ ऐवजी त्या शेतकऱ्यांचे वन हक्क अधिनियम २००५ नुसार वनांमधील त्यांच्या जमिनीचे धारण क्षेत्र निश्चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्रांआधारे धान खरेदी करण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यास परवानगी मिळालेली होती; परंतु ऑनलाइन धान खरेदीच्या पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे सदर खरेदी ठप्प पडलेली होती. मात्र, ही समस्या मार्गी लागली आहे.