शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांकडून १५ कोटींची धान खरेदी

By admin | Updated: January 8, 2016 02:01 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील विविध धान खरेदी केंद्रांवरून ....

जिल्हाभरात ६६ केंद्र सुरू : धानाची आवक वाढली; आणखी नवे केंद्र मंजूर होणारगडचिरोेली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील विविध धान खरेदी केंद्रांवरून १८ नोव्हेंबर २०१५ ते ६ जानेवारी २०१६ या कालावधीत एकूण १५ कोटी १३ लाख ७९६ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. तसेच ११ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी संबंधित धान खरेदी केंद्रावरून उचल करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३५ मंजूर केंद्रांपैकी ३१ केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर याच योजनेंतर्गत अहेरी प्रादेशिक कार्यालयामार्फत संस्थांच्या वतीने मंजूर १६ पैकी १५ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली कार्यालयाअंतर्गत ३१ केंद्रांवरून आतापर्यंत संस्थांच्या वतीने ११ कोटी ४५ लाख ३२ हजार ५०९ रूपये किंमतीचे एकूण ८१ हजार २२८.७३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. अहेरी कार्यालयाअंतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने १५ केंद्रांवरून २ कोटी २१ लाख १३ हजार १८५ रूपये किंमतीच्या १५ हजार ६८३.११ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान खरेदीसंबंधीत संस्थांनी हुंड्या वटविल्या आहेत. यातून धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी १७ लाख ५ हजार ५५६ रूपये अदा करण्यात आले आहे. मात्र काही संस्थांकडून हुंड्या वटविण्यात न आल्याने ८ कोटी २८ लाख २६ हजार ९५३ रूपयांचे धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. कुरखेडा तालुक्यातील नऊ संस्थांच्या वतीने कुरखेडा, कढोली, नान्ही, गोठणगाव, गेवर्धा, अंधळी, शिरपूर, सोनसरी व मौशी या नऊ केंद्रांवरून आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ९० हजार ४३२ रूपये किंमतीचे २४ हजार १०६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील आठ संस्थांमार्फत आठ केंद्रांवरून २ कोटी २० लाख १३ हजार ९२१ रूपये किंमतीचे १५ हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यातील आठ संस्थांच्या वतीने आठ केंद्रांवरून २ कोटी ३९ लाख ३८ हजार ६२७ रूपये किंमतीचे १६ हजार ९७७ क्विंटल धान खरेदी झाली आहे. धानोरा तालुक्यात सहा संस्थांच्या सहा केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापैकी चार केंद्रांवरून १ कोटी ८१ लाख ४३ हजार १४६ रूपये किंमतीच्या १२ हजार ८६७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. घोट, मक्केपल्ली, रेगडी या तीन केंद्रांवरून १ कोटी ६४ लाख ४६ हजार ३८१ रूपये किंमतीच्या ११ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ३१ केंद्रांवरून आतापर्यंत १ कोटी ४६ लाख ६१ हजार १६९ रूपये किंमतीचे ७ हजार ६७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यात पाच केंद्रावरून ६ लाख ७२ हजार ६४५ रूपये किंमतीचे ३२०.८९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. कोरची तालुक्यात एका केंद्रावरून २ लाख ७५ हजार १५९ रूपये किंमतीचे ५३५.३० क्विंटल तर आरमोरी तालुक्यात चार केंद्रांवरून ३१ लाख २५ हजार ९४० रूपये किंमतीचे १५२०.८७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील चार केंद्रांवरून ४२ लाख १३ हजार ८६६ रूपये किंमतीचे २०५३.५७ क्विंटल धान खरेदी आतापर्यंत झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)