जलयुक्त शिवार दिंडीतून जनजागृती

By Admin | Updated: May 30, 2015 02:03 IST2015-05-30T02:03:47+5:302015-05-30T02:03:47+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वैरागड परिसरात दिंडी काढून जलसंधारणाच्या कामावर जनजागृती करण्यात आली.

Public awareness through Dindu water tank | जलयुक्त शिवार दिंडीतून जनजागृती

जलयुक्त शिवार दिंडीतून जनजागृती

वैरागड : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वैरागड परिसरात दिंडी काढून जलसंधारणाच्या कामावर जनजागृती करण्यात आली.
आरमोरी तालुक्यात वैरागड, कुरंडी (माल), पिसेवडधा, कोरेगाव, मांगदा, शंकरनगर व आरमोरी येथे चित्ररथ फिरून जलदिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना व्हिडिओ चित्रफीत दाखवून पाणी व्यवस्थापन व जलसंधारणाच्या कामाबाबत जनजागृती करण्यात आली. गांडूळ खत कसे तयार करावे, शेंद्रिय शेती कशी करावी, पावसाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, आदीसह खते व बियाण्यांचा योग्य वापर आदीबाबत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.
या अभियानात आरमोरीचे तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी सहायक आंबिलडुके, मसराम, कुंभरे, डी. बी. ठाकरे, दीपिका क्षीरसागर, डी. ए. मत्ते आदी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी कटरे यांनी म्हणाले की, शेतकऱ्यांनी प्रगती करण्यासाठी जलव्यवस्थापनाचे धडे घेणे आवश्यक आहे. कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती साधावी, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Public awareness through Dindu water tank