ग्रामस्तरावर कृषी निविष्ठा उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:45+5:302021-06-06T04:27:45+5:30

काही दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा होणे आवश्यक आहे. अशा ...

Provide agricultural inputs at village level | ग्रामस्तरावर कृषी निविष्ठा उपलब्ध करणार

ग्रामस्तरावर कृषी निविष्ठा उपलब्ध करणार

काही दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करण्याकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतकरी गट, कंपनीकडे खते, बियाणे व कीटकनाशके यांची मागणी नोंदविण्याबाबत प्रवृत्त केले जात आहे. त्यानुसार शेतकरी गट, कंपनीमार्फत सदर कृषी निविष्ठांची खरेदी करून शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. चामोर्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक निविष्ठांसाठी गावातील शेतकरी गट किंवा कंपनीकडे नाेंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.

Web Title: Provide agricultural inputs at village level