शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST

गडचिरोली : पृथ्वी, वायू, जल, आकाश व अग्नी हे निसर्गाचे अविभाज्य घटक असून ही पंचमहाभूते म्हणून ओळखले जातात. त्या ...

गडचिरोली : पृथ्वी, वायू, जल, आकाश व अग्नी हे निसर्गाचे अविभाज्य घटक असून ही पंचमहाभूते म्हणून ओळखले जातात. त्या दृष्टीने निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून शहरातील नागरिकांनी रक्षण करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांनी केले.

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रदूषण कमी हाेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा व पर्यावरणाचेे संतुलन राहावे, असा संदेश देण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली. नगर परिषद कार्यालयातून रॅलीस प्रारंभ होऊन इंदिरा गांधी चौकापर्यंत पर्यावरण व प्रदूषण मुक्त गडचिरोली, अशी घोषणा देत जनजागृती करण्यात आली.

यावेळी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, प्रभारी मुख्याधिकारी माधुरी सलामे, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, अग्निशमन पर्यवेक्षक अनिल गोवर्धन, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, आरोग्य विभागाचे राजेश मधुमटके, तृप्ती व इतर कर्मचारी उपस्थित होते.