शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे रक्षण करणे आज काळाची गरज

By admin | Updated: June 16, 2016 01:38 IST

पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे,

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश : वृक्ष लागवडीचे आवाहनचंद्रपूर : पर्यावरण शुध्द राखले नाही तर जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, कारण पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व चंद्रपूर वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.एस. इंगळे, वन प्रशासन विकास व्यवस्थापक अशोक कवीटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.संजय ठाकरे म्हणाले, इंधन, पेट्रोल, डिझल, कोळसा यांच्या वापरामुळे कॉर्बनडाय आक्साईड मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा भारतात चवथ्या क्रमांकावर प्रदूषित जिल्हा म्हणून गणला गेला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित होवून लढा देण्याची गज आहे. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी.एस. इंगळे म्हणाले, जंगलातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तापमान वाढीमुळे समुद्राजवळील शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे जंगलाचे संगोपण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन संचालक अशोक कविटकर, वकील संघाचे अध्यक्ष पी.एस. सपाटे यांनीही वन विभागाशी संबंधित कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१, गिरीश अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश ४ एन.आर. नाईकवाडे, नागपूरे, विभागीय वन अधिकारी वाघाडे, आदी मंचावर उपस्थित होते. वन अधिकारी तलमले यांनी प्रास्ताविक केले. संचालन वनपाल गजपुरे तर आभार अ‍ॅड. महेंद्र असरेट यांनी मानले. यशस्वीतेसाठी तलमले, हिवरे, टी.एम. फुल्लुके, एम.एम. जनबंधु, एल. एम. उपरे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)