प्राथमिक, माध्यमिक शाळांचे वर्ग जोमात, महाविद्यालये मात्र अजूनही कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:06+5:302021-02-05T08:54:06+5:30

गाेंडवाना विद्यापीठाअंतर्गत संलग्नित एकूण १७४ महाविद्यालये आहेत. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. गडचिराेली जिल्ह्यात ...

Primary and secondary school classes are in full swing, but colleges are still in a coma | प्राथमिक, माध्यमिक शाळांचे वर्ग जोमात, महाविद्यालये मात्र अजूनही कोमात

प्राथमिक, माध्यमिक शाळांचे वर्ग जोमात, महाविद्यालये मात्र अजूनही कोमात

गाेंडवाना विद्यापीठाअंतर्गत संलग्नित एकूण १७४ महाविद्यालये आहेत. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. गडचिराेली जिल्ह्यात ६६, तर चंद्रपूर जिल्ह्यात १०८ महाविद्यालये आहेत. सर्व महाविद्यालये मिळून जिल्ह्यात एकूण ६७ हजार इतके प्रवेशित नियमित विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश भाग अतिसंवेदनशील आहे. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी राहात नाही. परिणामी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. विद्यापीठाअंतर्गत सर्व वरिष्ठ महाविद्यालयांतील प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व महाविद्यालयांकडून हाेत आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यास महाविद्यालयीन शिक्षण प्रक्रियेला गती येणार आहे.

बाॅक्स...

६६

एकूण महाविद्यालये

६७०००

एकूण विद्यार्थी

बाॅक्स.....

६७ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

ऑनलाईन व प्रत्यक्ष शिक्षणात बराच फरक आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पूर्णत: आटाेक्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळा, बाजारपेठ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. फेब्रुवारी महिना सुरू हाेऊनही वरिष्ठ महाविद्यालयातील वर्ग प्रत्यक्ष भरविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला नाही. परिणामी ६७ हजार विद्यार्थी महाविद्यालयात येऊन शिक्षण घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काेट....

काेराेनाचा प्रादुर्भाव आटाेक्यात आला असल्यामुळे वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात यावी. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यास प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभेल. अध्ययन व अध्यापनात गाेडी वाढून शैक्षणिक गुणवत्ता साधण्यास मदत हाेईल.

- स्नेहल कडस्कर, विद्यार्थिनी

काेट....

इंटरनेट कनेक्टिव्हीटीअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू केल्यास आम्हा विद्यार्थ्यांना साेयीचे हाेईल. गेल्या आठ, नऊ महिन्यांपासून घरी बसून कंटाळा आला आहे.

- पियुष सावरबांधे, विद्यार्थी

काेट.....

काेराेना महामारीची समस्या नियंत्रणात आली आहे. शिवाय काेराेनावरील लसीकरणही सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करून प्रत्यक्ष वर्ग भरवावेत, अशी आमची मागणी आहे.

- लीलाधर भरडकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

काेट...

वरिष्ठ महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालये सुरू करावीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे याेग्यरित्या आकलन व्हावे, त्यांचे करिअर घडावे, यासाठी प्रत्यक्ष वर्ग भरविणे गरजेचे आहे.

- अधीर इंगाेले, जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय

Web Title: Primary and secondary school classes are in full swing, but colleges are still in a coma