शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा प्रशासनाकडून गर्भवतीची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

मंडलापूर येथील स्वर्णरेखा या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला सुरूवातीला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु येथे शस्त्रक्रियेच्या अपुऱ्या सोयी व अहेरी तसेच गडचिरोली रूग्णालयापर्यंतचे लांब अंतर ही समस्या ओळखून कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिका रवाना झाली. परंतु सदर रूग्णवाहिका तेलंगणा सीमेवर पोलिसांनी अडविली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा हस्तक्षेप : दीड तासानंतर महिला पोहोचली मंचेरियलच्या रूग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या मंडलापूर येथील स्वर्णरेखा तुमनुरी या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयातून बाहेर रेफर करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणातील मंचेरियालच्या रूग्णालयात नेण्याचे ठरविले. परंतु तेलंगणा सीमेवर रूग्णवाहिका अडविण्यात आली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रूग्णवाहिका सोडण्यात आली.मंडलापूर येथील स्वर्णरेखा या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला सुरूवातीला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु येथे शस्त्रक्रियेच्या अपुऱ्या सोयी व अहेरी तसेच गडचिरोली रूग्णालयापर्यंतचे लांब अंतर ही समस्या ओळखून कुटुंबीयांनी महिलेला तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिका रवाना झाली. परंतु सदर रूग्णवाहिका तेलंगणा सीमेवर पोलिसांनी अडविली. रूग्णवाहिकेला तेलंगणा राज्यात प्रवेश देण्यास मज्जाव केला. यावेळी महिलेला प्रसूतीकळा असह्य होण्यास सुरूवात झाली. जवळपास एक तास तेलंगणा सीमेवर रूग्णवाहिकेला पोलिसांनी अडवून ठेवले. याबाबत काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना दिली. त्यांनी मंचेरियालच्या जिल्हाधिकारी भारती होलिकेरी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी ऐकले नाही. त्यामुळे भोपालपल्लीचे पो.अधीक्षक संग्राम पाटील व रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी सूचना दिल्यानंतर रूग्णवाहिकेला तेलंगणात प्रवेश देण्यात आला.कुटुंबीयांनाही मनस्तापसोयीसुविधांअभावी महिलेला मंचेरियालच्या रूग्णालयात पोहोचविण्यासाठी संचारबंदीमुळे कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रूग्णवाहिका मंचेरियाल येथे पोहोचण्यासाठी रात्र झाली. तेथील खासगी रूग्णालयात महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र यासाठी कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास झाला. संचारबंदी किंवा प्रवेशबंदीच्या काळातही आकस्मिक सेवा असणाऱ्या रुग्णांना अडविता येत नाही. असे असताना तेलंगणा पोलिसांच्या असंवेदनशिलतेबद्दल सिरोंचावासियांमध्ये चिड व्यक्त होत आहे.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाPoliceपोलिस