अनुकंपाधारकांची तात्पुरती प्रतीक्षाधीन यादी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:34 IST2021-02-07T04:34:04+5:302021-02-07T04:34:04+5:30

गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या १५१ अनुकंपाधारकांची तात्पुरती प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात आली असून, ही यादी जिल्हा परिषद, ...

Prepare a temporary waiting list of sympathizers | अनुकंपाधारकांची तात्पुरती प्रतीक्षाधीन यादी तयार

अनुकंपाधारकांची तात्पुरती प्रतीक्षाधीन यादी तयार

गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या १५१ अनुकंपाधारकांची तात्पुरती प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात आली असून, ही यादी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नाेटीस बाेर्डवर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना अनुकंपातत्त्वावर नाेकरी देण्याच्या उद्देशाने ११ फेब्रुवारी २०२० राेजी ज्येष्ठता क्रमांकानुसार यादी तयार करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हता, सेवा भरती नियम, शासन निर्णयातील विद्यमान तरतुदी आदी बाबी विचारात घेऊन वर्ग-३च्या पदावर नियुक्तीसाठी १४५ जण, तर वर्ग ४च्या पदावर नियुक्तीसाठी सहा उमेदवारांची प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात आली आहे.

ही यादी दि. ५ फेब्रुवारी राेजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत काही आक्षेप असल्यास १५ दिवसांच्या आत लेखी आक्षेप नाेंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Prepare a temporary waiting list of sympathizers