शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती मुलीच्या वडिलाला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:10 IST

प्रसूतीसाठी मुलीला दवाखान्यात भरती करण्यासाठी रूग्णवाहिका मागण्याच्या उद्देशाने गेलेल्या गरोदर महिलेच्या

सीईओंकडे तक्रार : वैरागड पीएचसीतील वाहनचालकाकडून घडला प्रकार वैरागड : प्रसूतीसाठी मुलीला दवाखान्यात भरती करण्यासाठी रूग्णवाहिका मागण्याच्या उद्देशाने गेलेल्या गरोदर महिलेच्या वडिलाला वाहनचालकाने अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. संबंधित वाहनचालकावर कारवाई करावी, अन्यथा दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा वैरागड येथील नागरिकांनी दिला आहे. रोशनी मुकेश श्रीरामवार ही बाळंतपणासाठी तिचे वडील अनिल आयलवार यांच्याकडे वैरागड येथे माहेरी आली होती. २४ मार्चला प्रसूती वेदना सुरू झाल्याने आयलवार यांनी वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील वैैद्यकीय अधिकारी डॉ. विलास वाघमारे यांच्याकडे रूग्णवाहिकेची मागणी केली. डॉ. वाघमारे यांनी दवाखान्याच्या रूग्णवाहिकेचे चालक निवासस्थानी राहतात. त्यांना बोलावून आणा व वाहन घेऊन जा, असे सांगितले. त्याप्रमाणे आयलवार हे रूग्णवाहिकेचे चालक दशरथ कोवे यांना बोलाविण्यास गेले असता, त्यांच्या पत्नीने दशरथ कोवे यांची प्रकृती बरी नाही, असे सांगितले. पण मुलगी अस्वस्थ असल्याने आयलवार यांनी वाहन आणण्याचा आग्रह कोवे यांच्याकडे केला असता, कोवे यांनी आयलवार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. वाहन चालकाच्या या असभ्य वर्तणुकीमुळे आयलवार यांनी आपल्या गरोदर मुलीला खासगी वाहनातून दवाखान्यात नेले व सुरळीत प्रसूती झाली. गरोदर मातेसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास कोवे यांनी टाळाटाळ केली आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली आहे. कोवे यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा रूग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)