शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात ...

गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात वीजपुरवठा केला जातो. गुडीगुडम ते जिमलगट्टा यामधील अंतर जवळपास ३० ते ३५ किमी आहे. जिमलगट्टा ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. त्या वीज उपकेंद्रामध्ये जिमलगट्टा, देचलीपेठा, उमानूर, मरपल्ली तसेच रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, गुडीगुडम अशा तीन ते चार बाजूंना वीजपुरवठा करावा लागतो. हा परिसर खूप मोठ्या क्षेत्रफळात व्यापला आहे. एवढ्या मोठ्या परिसराला वीजपुरवठा करणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे वीज उपकेंद्रावर जास्तीचा भार पडत आहे.

हलकासा पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. हलक्याशा वादळाने वीजपुरवठा तासन‌्तास खंडित होतो. पूर्वी या परिसरात तीन ते चार वीज कर्मचारी (लाइनमन) असत. त्या वेळी वीज ग्राहक कमी होते. आता वीज ग्राहक वाढले व वीज कर्मचारी (लाइनमन) कमी झाले.

सध्या एक स्थायी कर्मचारी व दोन रोजंदारी कर्मचारी आहेत. वीजपुरवठा घनदाट जंगलातून असल्याने कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होतो. त्यामुळे वीजपुरवठा भूमिगत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कमलापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्मितीसाठी मंजुरी मिळाली; मात्र आत्तापर्यंत थांगपत्ता नाही.