शाळा परिसरातील विद्युत जनित्र धोकादायक

By Admin | Updated: January 3, 2015 01:13 IST2015-01-03T01:13:03+5:302015-01-03T01:13:03+5:30

आरमोरी पंचायत समितींतर्गत वैरागड येथील मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत जनित्र उभे आहे.

Power Generator in School Area Dangerous | शाळा परिसरातील विद्युत जनित्र धोकादायक

शाळा परिसरातील विद्युत जनित्र धोकादायक

वैरागड : आरमोरी पंचायत समितींतर्गत वैरागड येथील मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत जनित्र उभे आहे. या ठिकाणी विद्युत बिघाडामुळे ५ ते ६ वेळा स्पार्किंगच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे सदर विद्युत जनित्र विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
सुरूवातीला या शाळा इमारतीजवळ विद्युत जनित्र नव्हते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कोणताही धोक नव्हता. मात्र आता या विद्युत जनित्रालगत नवीन शाळा वर्गखोलीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे सदर विद्युत जनित्र आता शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. विद्युत विभागाने शाळा इमारती लगत असलेले सदर विद्युत जनित्र इतरत्र हलवावे, अशी मागणी वैरागड येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सुरूवातीला सदर विद्युत जनित्र शाळा इमारतीपासून लांब अंतरावर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही धोका नव्हता. मात्र त्यानंतर शाळेची मुख्य इमारत जीर्ण झाल्यामुळे शाळा वर्ग खोलीचे बांधकाम या विद्युत जनित्रालगत करण्यात आले. सध्या या नव्या शाळा इमारतीत वर्ग भरविल्या जात आहे. या परिसरात शाळेचे विद्यार्थी नेहमी फिरत असतात. त्यामुळे सदर विद्युत जनित्रामुळे विद्यार्र्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या शाळा इमारती लगत असलेले विद्युत जनित्र इतरत्र हटविण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांमार्फत प्रशासनाकडे केली होती. मात्र याकडे विद्युत विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Power Generator in School Area Dangerous