शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सांडरा-अहेरी बायपास मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोयीस्कर मार्ग म्हणून या ...

सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोयीस्कर मार्ग म्हणून या मार्गाला पसंती आहे. अहेरी तालुक्यातील रस्त्याच्या समस्येबाबत अजूनही वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याची समस्या अजूनही कायम आहे. आतापर्यंत कित्येक अधिकारी व लोकप्रतिनिधी बदलले. मात्र, रस्त्याची समस्या ‘जैसे थे’च दिसून येत आहे.

सदर सांडरा बायपास अहेरी मार्ग तालुकास्थळी जाण्यास जवळचा व सोयीस्कर ठरतो म्हणून बहुतांश वाहनधारक व कर्मचारी व नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात. सांडरा बायपास मार्गाने गेल्यास सांडरा, व्यंकटरावपेठा, गडअहेरी व अहेरी तसेच सांडरापासून डाव्या बाजूला गेल्यास इंदाराम काटेपल्ली, देवलमरी, आवलमरी, काेटागुडा, चिंटावंटा, लंकाचेन असे रेगुंठाकडेही याच मार्गाने जातात. या मार्गाचे डांबरीकरण उखडून गिट्टी पूर्णतः बाहेर पडली आहे. चेंदामेंदा झाला आहे. या मार्गाच्या जवळपास असलेल्या गावातील नागरिक रस्त्यावर उखडून पडलेली गिट्टी बांधकामास नेत असल्याचे चित्र दिसून आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यापासून आतापर्यंत दुरुस्ती किंवा देखभाल न केल्याने या मार्गाची अवस्था अतिशय बिकट आहे.