खेळाडू प्रतीक्षा लाडे हिचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:04+5:302021-02-09T04:39:04+5:30

कुरखेडा : स्थानिक श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा कामसेन लाडे हिचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या ...

Player Pratiksha Lade felicitated | खेळाडू प्रतीक्षा लाडे हिचा सत्कार

खेळाडू प्रतीक्षा लाडे हिचा सत्कार

कुरखेडा : स्थानिक श्री. गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा कामसेन लाडे हिचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. गाेंडवाना विद्यापीठात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडूंना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गाेंडवाना विद्यापीठाला प्रथमच काॅफीबाॅल स्पर्धेेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला हाेता. या संघाचे प्रतिनिधित्व श्री. गाेविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रतीक्षा लाडे हिने केले हाेते. तिच्या या यशाबद्दल ना. सामंत यांच्या हस्ते प्रतीक्षाचा गाैरव करण्यात आला. या वेळी कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ. अनिता लाेखंडे उपस्थित हाेते. यशाबद्दल प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे व कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.

Web Title: Player Pratiksha Lade felicitated