शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रेकरू तहसीलवर धडकले

By admin | Updated: February 3, 2016 01:26 IST

मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला लोकांचा विरोध होत असल्याचे पाहून गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मंगळवारी पोचमपल्लीनजीकच्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पस्थळाला भेट दिली.

तहसीलदारांना निवेदन : पोचमपल्लीतून निघालेल्या शांती पदयात्रेचा सिरोंचात समारोपकोणाचेही नुकसान होऊ देणार नाही - पालकमंत्र्यांचे आश्वासनमेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला लोकांचा विरोध होत असल्याचे पाहून गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मंगळवारी पोचमपल्लीनजीकच्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पस्थळाला भेट दिली. येथील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सिरोंचा पंचायत समितीसमोर पदयात्रेकरूंची भेट घेतली. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील गावांना धोका पोहोचणार असल्यास आपणही या प्रकल्पाला विरोध करू, या सिंचन प्रकल्पाबाबत काही लोक अफवा पसरवित असून भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत. अफवांच्या आहारी जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सिरोंचा तालुक्यातील एकाही नागरिकांचे या प्रकल्पामुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पदयात्रेकरूंना दिले. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा भागातील २२ गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहे. शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिंचन प्रकल्पाला विरोध सुरू आहे. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विरोधात दुसऱ्या दिवशी मंगळवारी पेंटीपाका येथून शांतीपदयात्रेला सुरूवात झाली. लंबडपल्ली, मुगापूर, मृदूक्रिष्णापूर, राजन्नापल्ली, आरडा मार्गे जानमपल्ली, मदीकुंटा, मंडलापूर, चिंतलपल्ली, नरगममार्गे लिंगमपल्ली, धर्मपूरीला पदयात्रा पोहोचली. येथून रामंज्जापूर, नासीरखॉनपल्ली, सिरोंचा माल येथून सदर पदयात्रा सिरोंचात पोहोचली. सिरोंचा बसस्थानक, वन विभाग, ग्रामीण रूग्णालय मार्गे, पंचायत समिती चौकातून सदर शांतीपदयात्रा तहसील कार्यालयाकडे पोहोचली. पेंटीपाकापासून सिरोंचापर्यंत १६ किमी अंतर पदयात्रेकरूंनी कापले. या यात्रेदरम्यान प्रत्येक गावी गावकऱ्यांना मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती देण्यात आली. या शांतीपदयात्रेदरम्यान जय जवान, जय किसान, मेडिगट्टाचे सर्वेक्षण बंद करा, शेतकऱ्याला गळफास लावू नका, २१ व्या शतकात २१ गावांना बुडवू नका, अशा घोषणा पदयात्रेकरूंनी दिल्या. पदयात्रेकरूंच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सिरोंचाचे तहसीलदार कुमरे यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार कडार्लावार उपस्थित होते. निवेदन देताना मेडिगट्टा धरणविरोधी समितीच्या किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली, सतीश भोगे, सत्यम गोरा, किरण वेमुला, पोचम सदुला, विनोद गुरूसिंग, मनिकंटा वेमुला, विशाल मच्चिडी, योगेश वेमुला, राजमल्लू पदाबोईना, क्रिष्णमनोहर येरोला, प्रभाकर गोगुला, नागराजू गड्डम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)