शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Updated: December 22, 2015 01:34 IST

सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय

गडचिरोली : सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्या संयुक्त विद्यमाने १३ डिसेंबरपासून सूरजागड येथून काढलेली संघर्ष पदयात्रा सोमवारी गडचिरोली शहरात पोहोचली. या पदयात्रेचे गडचिरोलीकरांनी स्वागत केले. खासदार अशोक नेते यांच्या घरासमोर दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले.१३ डिसेंबरपासून सदर संघर्ष पदयात्रेला सूरजागड येथून प्रारंभ करण्यात आला. एटापल्ली, अहेरी, आलापल्ली, आष्टी, चामोर्शी, तळोधी मो., नवेगाव रै. येथून रविवारी सायंकाळी उशीरा गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थानात सूरजागड संघर्ष यात्रा पोहोचली. येथून सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात पदयात्रा दाखल झाली. येथील राधे बिल्डींगच्या समोर गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, नगरसेविका बेबी चिचघरे, न.प. सभापती विजय गोरडवार, नगरसेविका मिनल चिमुरकर यांनी पदयात्रेकरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व या संघर्ष पदयात्रेला पाठींबा दर्शविला. यावेळी त्यांच्यासोबत नईमभाई शेख, गिरीष खाडीलकर, दिलीप चिकराम, सुनिल चिमुरकर, जयश्री चांदेकर, श्रीरंग उंदीरवाडे, अनिल कुनघाडकर, रामदास उंदीरवाडे आदी उपस्थित होते. त्यानंतर सदर पदयात्रा खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर पोहोचली. या ठिकाणी भाजपच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेचे स्वागत केले. येथून सदर पदयात्रा खासदार नेते यांच्या घरासमोर पोहोचली. या ठिकाणी पदयात्रेकरूंनी तब्बल दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी पदयात्रेचे मुख्य आयोजक सुरेश बारसागडे यांनी या पदयात्रेचा उद्देश भाषणातून सांगितला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, गजानन येनगंधलवार, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, अनिल करपे, प्रकाश अर्जुनवार, गोवर्धन चव्हाण, संजय बारापात्रे, डेडूजी राऊत, स्वप्नील वरघंटे, नामदेव गडपल्लीवार, विलास भांडेकर आदी उपस्थित होते. ठिय्या आंदोलन आटोपल्यानंतर संघर्ष पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचली. अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर सदर पदयात्रेची सांगता करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)