पेंढरीच्या सरपंचपदी पवन येरमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST2021-02-19T04:25:56+5:302021-02-19T04:25:56+5:30

धानाेरा : तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १६ फेब्रुवारीला पार पडली. यात सरपंचपदी पवन येरमे तर उपसरपंच ...

Pawan Yerme as Sarpanch of Pendhari | पेंढरीच्या सरपंचपदी पवन येरमे

पेंढरीच्या सरपंचपदी पवन येरमे

धानाेरा : तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १६ फेब्रुवारीला पार पडली. यात सरपंचपदी पवन येरमे तर उपसरपंच लक्ष्मी आतला यांची बिनविराेध निवड झाली. पेंढरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव हाेते. एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळी उपस्थित हाेते. गणपूर्ती झाल्यामुळे सभा सुरू करण्यात आली. सभेला नवनिर्वाचित सदस्य पवन येरमे, लक्ष्मी आतला, तृशाल येरमे, मंजूषा पवार, लता पावे, नैना आतला हे सदस्य उपस्थित हाेते. सरपंचपदासाठी पवन येरमे व उपसरपंचपदासाठी लक्ष्मी आतला यांचा प्रत्येकी एकच नामांकन अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे या दाेघांचीही बिनविराेध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार भगत, तलाठी आडे, ग्रामसेवक खुणे उपस्थित हाेते. निवडणुकीनंतर जल्लाेष करण्यात आला. यावेळी तंमुस उपाध्यक्ष संताेष मंडल, कालिदास लेनगुरे, प्रणय माेहुर्ले, प्रशांत पेदापल्लीवार, अंताराम आतला, नकुल येरमे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Pawan Yerme as Sarpanch of Pendhari