बलात्कार करणाऱ्या पाेलिसास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:31 IST2021-01-15T04:31:07+5:302021-01-15T04:31:07+5:30

विनाेद याने १८ मार्च २०११ राेजी दहाव्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसाेबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधाचा ...

Palisas imprisoned for rape | बलात्कार करणाऱ्या पाेलिसास कारावास

बलात्कार करणाऱ्या पाेलिसास कारावास

विनाेद याने १८ मार्च २०११ राेजी दहाव्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसाेबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधाचा व्हिडिओ शूट करून ठेवला. हा व्हिडिओ इतरांना दाखविण्याची धमकी देऊन मे २०१५ पर्यंत त्याने पीडित मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने लग्नाबाबत विचारले असता, विनाेदने लग्नास नकार दिला व ६ मे २०१५ राेजी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. २५ ऑगस्ट २०१५ राेजी पाेलीस स्टेशन आरमाेरी येथे विनाेद बावणे यांच्या विराेधात तक्रार दाखल केली. त्यावरून भादंवि कलम ३७६ (२), ५०६ अन्वये गुन्हा दाखल व अटक केली.

आरमाेरी पाेलीस स्टेशनचे पाेलीस उपनिरीक्षक शरद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली. दंडाच्या रकमेतील ७५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षाची बाजी ॲड.अनिल प्रधान यांनी मानली. काेर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पाेलीस निरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.

Web Title: Palisas imprisoned for rape