पलसगडची पाणी योजना निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:44+5:30

गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.

Palasgarh's water plan fails | पलसगडची पाणी योजना निकामी

पलसगडची पाणी योजना निकामी

Next
ठळक मुद्देएक वर्षापासून योजना बंद : लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा: कुरखेडा तालुक्याच्या पलसगड येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून टाकी उभारण्यात आली. तसेच नळ पाईपलाईन व इतर कामे करण्यात आली. मात्र सुरू झालेली ही नळ योजना सहा महिन्यांतच बंद पडली. गेल्या वर्षभरापासून नळ योजना बंद असल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.
सदर नळ योजनेचे काम करताना निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले तसेच साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले. त्यामुळे ही नळ योजना अल्पावधीतच बंद पडली आहे. परिणामी या योजनेवरील शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाने उचित कारवाई करून सदर नळ योजना पूर्ववत सुरू करावी, नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पलसगड, सलंगटोला व मौशी या तीन गावातील नागरिकांनी केली आहे.

कोट्यवधी खर्चुनही गावे तहानलेलीच
जलस्वराज्य अभियानअंतर्गत कुरखेडा तालुक्यात अनेक गावांना पाणीपुरवठा योजना बांधून दिल्या. त्यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. पाणीपुरवठा योजना चालविण्याची क्षमता नसलेल्या ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा योजना बांधून दिल्या. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने योजनेत निर्माण झालेला बिघाड दुरूस्त करणे शक्य झाले नाही. तसेच काही ग्रामपंचायतींनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना काही गावांना करावा लागत आहे. गावातील पाणी टाकी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.

Web Title: Palasgarh's water plan fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.