शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून केंद्रावर धान पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसिमुलतला परिसरातील शेतकरी त्रस्त : खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु असलेल्या घोट येथील विकास सहकारी भात गिरणीच्या धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या धानाचा काटा लवकर करण्यात येतो. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचे धान मोजले जात नाही. त्यांना प्रतीक्षाच करावी लागते, असा आरोप सिमुलतला येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केला.
घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अनेक शेतकरी येथील खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकरिता येत आहेत. परंतु त्यांच्या धानाचा काटा करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या धान खरेदीची योग्य सोय करावी, अशी मागणी माजी सरपंच श्यामल मंडल, विमल हाजरा, रतन पाईक, शेखर रॉय, भण्णाजीत मंडल, सुरेश मिस्त्री अमला बिश्वास, शंकर मल्लीक, निरंजन मैत्र, रंजीत मंडल, गौरंग हलदर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

रेगडी आविका संस्थेचे कार्यालय व गोडावूनला ठोकले कुलूप
चामोर्शी तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत येणाऱ्या रेगडी आविका संस्थेचे व्यवस्थापक भोंगळ कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी गोडावून व कार्यालयाला कुलूप ठोकले. रेगडी खरेदी केंद्राअंतर्गत बोलेपल्ली, हेटलकसा, रेगडी, देवदा, गरंजी, वेंगनूर, पुल्लीगुंडम, अडंगेपल्ली, सुरगाव आदी नऊ गावे येतात. या संस्थेत व्यवस्थापक पदावर मनोहर भोवरे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी तीन वर्षांपासून प्रती कट्टा पाच रुपये प्रमाणे अवैध रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली तसेच २०१२-१३ व २०१६-१७ या दोन वर्षातील बारदाण्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांकडून हमालीची रक्कमही घेतली, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी सभा घेऊन १९ डिसेंबरला नारेबाजी करीत कार्यालय व धान गोडाऊनला कुलूप ठोकले. यासंदर्भात मनोहर भोवरे यांची विचारणा केली असता, चामोर्शीच्या सहायक निबंधकाकडून चौकशी झाली आहे. या चौकशीत काहीच तथ्य न आढळल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड