संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:13 IST2025-08-18T21:12:47+5:302025-08-18T21:13:40+5:30

Crime News: एका सराफा व्यावसायिकाने २३ वर्षीय तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने तिच्यासोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओही बनवले होते. 

Outrageous! 23-year-old girl raped multiple times, bullion merchant also made a video | संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये एक संतापजनक घटना समोर आली. एका सराफा व्यावसायिकाने एका २३ वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ बनवले आणि हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागला. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुनील पंडलिक बोके असे आरोपीचे नाव आहे. तर अक्षय कुंदनवार याच्यावरही आरोपीची मदत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. 

पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीचे देसाईगंजमधील गांधी वार्ड परिसरात ज्वेलर्सचे दुकान आहे. तरुणी कामानिमित्त दुकानात गेली होती. त्यानंतर आरोपी सुनील बोके याने तरुणीशी संपर्क सुरू केला.

लग्नाचे आमिष अन्...

तरुणीला आरोपीने तुझ्याशी लग्न करतो असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्येही जवळी निर्माण झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. 

आरोपीने ब्लॅकमेल करत तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. त्यानंतर मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळेल्या तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला. त्यानंतर आरोपी बोकेने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्या मदतीने तिच्या संपर्क केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दबाव आणला. 

सगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत असल्याने तरुणीने देसाईगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. 

Web Title: Outrageous! 23-year-old girl raped multiple times, bullion merchant also made a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.