शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर पडणाऱ्यांची गडचिरोली वाहतूक पोलिसांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली.

ठळक मुद्देसंचारबंदीची कडक अंमलबजावणी : कारणानुसार दाखवावी लागतात कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने २३ जानेवारीपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाºया वाहनधारकांचे वाहन अडवून गडचिरोली वाहतूक पोलीस तपासणी करीत असल्याचे चित्र गुरूवारी गडचिरोलीत पहायला मिळाले. घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात आहे. कारणाशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू दाखविल्यावरच त्यांना सोडले जात आहे.राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अनेकांनी पोलिसांच्या दंडुक्याचा अनुभव घेतला. त्यानंतर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली. मात्र पोलिसांच्या धोरणावर राज्यभरातून टिका सुध्दा झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक मारू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानुसार आता गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.पोलीस ये-जा करणाऱ्या नागरिकांचे वाहन अडवून बाहेर निघण्याचे कारण विचारत आहेत. एखादे कारण सांगितल्यानंतर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे किंवा इतर वस्तू आहेत काय, हे सुध्दा विचारले जात आहे. एखाद्या व्यक्तीने भाजीपाला घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले तर त्याच्याकडे थैली आहे काय हे बघितले जाते. मेडीकलमध्ये जातो असे सांगितले तर त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी आहे काय, हे बघितले जात आहे. तसेच संपूर्ण शहरात गस्त घालून नागरिक अनावश्यक बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक अजुनही नियंत्रणात आहे.नागरिकांनी गैरफायदा घेऊ नयेकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन हे कठोर निर्णय घेतले आहेत. संचार बंदीतही आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले आहे. त्यादृष्टीनेच पोलीस विचारपूस करीत आहेत. ठोस कारण सांगितल्यानंतरच सोडले जात आहे. मात्र या संधीचा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.गडचिरोलीच्या गुजरीत पोलीस तैनातगडचिरोली येथे भरणारा आठवडी बाजार रद्द झाला आहे. तसेच इतर ठिकाणी होणारी भाजी विक्री सुध्दा बंद झाली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक गडचिरोली शहरातील गुजरीत मोठ्या प्रमाणात येत आहेत. गुजरीमध्ये गर्दी उसळून भाजीपाला खरेदी करताना मोठी गर्दी उसळते. तसेच अंतर ठेवण्याचे नियमही पाळले जात नव्हते. ही बाब लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने अंतर पाडण्यासाठी डबे आखले आहेत. तसेच गुजरीत तीन पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेते व ग्राहक अंतराच्या नियमाचे पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस