शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या प्रवाहात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:59 IST

मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन

अरविंद सोवनी यांचे आवाहन : नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात छल्लेवाडा येथे भूमकाल संघटनेची धिक्कार सभारेपनपल्ली : मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन आदिवासी नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायामुळे दुर्गम भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नागरिकांनी नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन भूमकाल संघटनेचे पदाधिकारी अरविंद सोवनी यांनी केले. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कमलापूरवरून चार किमी अंतरावरील छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भूमकाल संघटनेतर्फे धिक्कार सभा शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर भूमकाल संघटनेचे अ‍ॅड. गोडाने, नागपूर विभागाचे बौध्द धम्म प्रचारक संघप्रीय गौतम , अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, प्रा. डॉ. श्रीकांत भोवते, प्रशांत विधे, रेपनपल्लीचे पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरिक्षक ढोबले आदी मान्यवर उपस्थित होते. बौध्द धम्म प्रचारक संघप्रिय गौतम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर नागरीकांनी मार्गक्रमण करावे, असे सांगितले. डॉ. श्रीकांत भोवते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर आम्ही चालतो, असे नक्षलवादी सांगतात. जर नक्षलवादी डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर चालले असते तर गतवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची हत्या नक्षलवाद्यांनी केली नसती. नक्षलवादी आंबेडकरांच्या विचारावर चालत असतील तर ते बंदुकीचा आश्रय का घेतात, असा सवाल भोवते यांनी यावेळी उपस्थित केला. गावातील लोक नक्षलवाद्यांना अन्न, पाणी, निवारा आदी वस्तू देत असतात. मात्र नक्षलवादी लोकांना मदत करण्याऐवजी त्यांची हत्या करीत असतात. नक्षलवाद ही समस्या केवळ गडचिरोली जिल्ह्यात नसून भारतातील १३ राज्यात कायम आहे. नक्षलवादी लोकांना मदत करण्यासाठी काम करीत नसून लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या सोयीसुविधापासून वंचित ठेवण्याचे काम करतात. छल्लेवाडा गावातील पाच दलित व्यक्तींची नक्षलवाद्यांनी हत्या केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर धिक्कार सभेला छल्लेवाडा परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)भविष्य अंधारात न ठेवण्याची केली सूचनाछल्लेवाडा या अतिदुर्गम भागात आजही पक्के रस्ते नाही. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा नाही. कच्चा रस्ता आहे पण त्यावर पूल नाही. याशिवाय अनेक समस्या कायम आहे. शासन व प्रशासन दुर्गम गावात सोयीसुविधा देऊन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र विकासकामाला नक्षलवादी विरोध करीत असल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना आधार देऊन आपले भविष्य अंधारात ठेवू नका. नक्षलवाद्यांना हाकलून लावून समाजाच्या मुख्य प्रवाहात या, अशी सूचना भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना केली.