शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग शिक्षणातून सक्षम व स्वावलंबनाची संधी

By admin | Updated: January 25, 2016 01:58 IST

सुदृढ आरोग्यामुळेच सशक्त समाजाची निर्मिती होते. शिक्षणाची पुरेशी सोय नसलेल्या भागात आरोग्य क्षेत्रात काम

गडचिरोली : सुदृढ आरोग्यामुळेच सशक्त समाजाची निर्मिती होते. शिक्षणाची पुरेशी सोय नसलेल्या भागात आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र डॉ. साळवे व इतर कॉलेजमधून मिळणाऱ्या नर्सिंग शिक्षणातून युवतींना सक्षम व स्वावलंबी होण्याची संधी निर्माण होते, असे प्रतिपादन नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. यशवंत पाटील यांनी केले. धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने ‘ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट’ या नृत्य व गायन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदिक महाविद्यालय बुलढाणाचे डॉ. राजेंद्र वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून चातगावच्या सरपंचा नीता मडावी, डॉ. प्रमोद साळवे, डॉ. अमित साळवे, माजी सरपंच नारायण सयाम, माजी सरपंच नारायण सयाम, रवी करपे, हेमंत परगते, अमित रामने आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र वाघ म्हणाले, नर्सिंगचा पेशा पत्करणाऱ्या युवतींना समाजपुढे बहिणीचा (सिस्टर) दर्जा मिळते. आजारपणामध्ये आपलेही लोक साथ देत नाही, अशावेळी नर्सेस त्यांची नि:स्वार्थ सेवा करतात, हे कार्य खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी समाजाला रोगमुक्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.डॉ. प्रमोद साळवे यांनी साळवे नर्सिंग कॉलेजच्या वतीने सन २००६ पासून ‘ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट’ हा उपक्रम राबविला जात आहे. यातून नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतींमध्ये आत्मविश्वास वाढत आहे, असे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका कावळे, संचालन प्राचार्य सविता सादमवार यांनी केले तर आभार डॉ. अमित साळवे यांनी मानले.वनौषधी उद्यानाचे उद्घाटन४डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या वतीने नर्सिंग प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींना वनौषधीचे महत्त्व पटवून देण्यासाठी वनौषधी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानात सध्या विविध ३२ प्रजातीच्या वनौषधीची लागवड करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला व फूलझाडाची सुध्दा येथे लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे उद्घाटन प्रा. डॉ. यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.