शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा तालुक्यात ९४ जागांसाठी एकच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

कुरखेडा : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या ९४ जागांसाठी केवळ एकच नामांकन प्राप्त झाल्याने या जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बिनविराेध निवड ...

कुरखेडा : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या ९४ जागांसाठी केवळ एकच नामांकन प्राप्त झाल्याने या जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बिनविराेध निवड झाली आहे. तर १५ जागांसाठी एकही नामांकन प्राप्त झाले नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत. परिणामी, ३५३ जागांपैकी केवळ २४४ जागांसाठीच मतदान हाेणार आहे.

कुरखेडा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या एकूण ३५३ जागा हाेत्या. त्यापैकी एका ग्रामपंचायतीत बिनविराेध निवडणूक झाली. तर तीन ग्रामपंचायतीत काही जागांसाठी नामनिर्देशनपत्रच प्राप्त झाले नाही. तर काही जागांसाठी केवळ एकच नामनिर्देशनपत्र प्राप्त झाल्याने या ग्रामपंचायतीत मतदान हाेणार नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात ३९ ग्रामपंचायतीतच मतदान हाेणार आहे. २४४ जागांसाठी आता मतदान हाेणार आहे. ७४२ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले हाेते. त्यापैकी १८ नामनिर्देशनपो अवैध ठरले, तर ६७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले. त्यामुळे आता ५८५ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराची रंगत वाढण्यास सुरुवात झाली आहे. आपले पॅनल गावाचा विकास कसा करून दाखवेल हे मतदारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा उमेदवार व मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणात रुची दाखविण्यास सुरुवात केल्याने निवडणूक प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे.

कुरखेडा तालुक्यातील काही ग्रामपंचायती नक्षलदृष्ट्या संवेदनशील भागात माेडतात. या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेणे पाेलीस प्रशासनासाठी आव्हान राहते. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पाेलीस प्रशासनाकडून नियाेजन केले जात आहे.