कांद्याची विक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:28+5:30

कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची आयात-निर्यात थांबल्याने भाव प्रचंड वधारले होते. मात्र त्यानंतर कांद्याचे भाव कमी झाले.

Onion sales are booming | कांद्याची विक्री जोमात

कांद्याची विक्री जोमात

ठळक मुद्देआवक सुरूच : गडचिरोली, आष्टीसह अनेक ठिकाणी पोहोचताहेत कट्टे

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी/गडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता असल्याने नागरिक ठोक स्वरूपात कांदे घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. गडचिरोली व आष्टी शहरात अनेक नागरिक कांद्याचे कट्टे खरेदी करताना दिसून येत आहेत.
कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची आयात-निर्यात थांबल्याने भाव प्रचंड वधारले होते. मात्र त्यानंतर कांद्याचे भाव कमी झाले. पावसाळ्यात पुन्हा कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक ठोक स्वरूपात कांदे खरेदी करीत आहेत.

५५० ते ६०० रूपये भाव
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बाजारात कांदे ३० रूपये दराने विकले जात आहेत. मात्र ठोक स्वरूपात कांदे स्वस्त पडत असल्याने अनेक नागरिकांचा कट्टे घेण्यावर भर आहे. ४० किलो कांदे असलेला कट्टा ५५० ते ६०० रूपये भावाने विकला जात आहे. विशेष म्हणजे गडचिरोली शहरात ५०० ते ५५० असा भाव आहे. मात्र आष्टीत कट्टा ६०० रूपयाला विकला जात आहे.

Web Title: Onion sales are booming

टॅग्स :onionकांदा