शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ओबीसींचे राजकीय आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

या वेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आदिवासीबहुल भागात ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा कॅबिनेटपुढे हा विषय आणला. ...

या वेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आदिवासीबहुल भागात ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा कॅबिनेटपुढे हा विषय आणला. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही प्रामाणिक होतो म्हणून हा निर्णय घेऊ शकलो; पण मागच्या सरकारने केवळ भूलथापा देऊन हा विषय टोलवला. गडचिरोली जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण ६ वरून १७ टक्के झाल्याने वर्ग ३ आणि ४ मधील विविध १४ प्रकारच्या पदभरतीत जिल्ह्यातील ओबीसी युवकांना आरक्षणाचा लाभ होईल.

या वेळी आ. अभिजित वंजारी यांनीही मार्गदर्शन केले. या स्वागत सोहळ्याला माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ओबीसी महासंघाचे शेषराव येलेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, हसनअली गिलानी, वामन सावसाकडे, अतुल मल्लेलवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, डी.डी. सोनटक्के, कुणाल पेंदोरकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

(बॉक्स)

रथाने वेधले लक्ष

वडेट्टीवार यांचे आरमोरीमार्गे गडचिरोलीत आगमन झाल्यानंतर त्यांना रथावर चढवून इंदिरा गांधी चौकापर्यंत वाजतगाजत आणण्यात आले. या वेळी ‘जय ओबीसी’ लिहिलेल्या पिवळ्या टोप्या डोक्यावर चढविलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष आणि जयघोष केला जात होता.

घटनादुरुस्तीसाठी केंद्राकडे मागणी

ओबीसींचे हे आरक्षण मर्यादित आहे. राजकीय आरक्षणासह पूर्ण आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. आरक्षण ५० टक्क्यांच्या वर नको, अशी ग्यानबाची मेख मारून ठेवली असल्यामुळे अनुसूचित जमाती क्षेत्रात ओबीसी आरक्षणाचा पूर्णपणे लाभ देताना अडचणीचे जाऊ शकते. त्यामुळे कलम २४३ सी आणि बी मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे या वेळी वडेट्टीवार म्हणाले.