आता उरले केवळ ७७८ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST2021-06-01T04:27:53+5:302021-06-01T04:27:53+5:30

आतापर्यंत बाधित २९३३५ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २७८३८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ७१९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद ...

Now only 778 active patients remain | आता उरले केवळ ७७८ सक्रिय रुग्ण

आता उरले केवळ ७७८ सक्रिय रुग्ण

आतापर्यंत बाधित २९३३५ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २७८३८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ७१९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. सोमवारी मृत्यू झालेला एक वृद्ध पुरुष मालेरा, ता. मुलचेरा येथील आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५० टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.६५ टक्के तर मृत्यूदर २.४५ टक्के झाला आहे.

नवीन ३३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३, अहेरी तालुक्यातील १, आरमोरी ७, चामोर्शी तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १, मुलचेरा तालुक्यातील २, सिरोंचा तालुक्यातील ५ तर देसाईगंज तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या १७० रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३८, अहेरी ११, आरमोरी १३, भामरागड ८, चामोर्शी २८, धानोरा ८, एटापल्ली ४, मुलचेरा १९, सिरोंचा ३१, कुरखेडा ६ तसेच देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Now only 778 active patients remain