शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची  दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन कंत्राटदाराने पावसाळ्यात दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरू केली. मात्र, पावसामुळे अनेक अडथळे निर्माण हाेत हाेते. परिणामी दुसरी बाजू अजूनही पूर्ण झाली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातून चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दीड वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, या मार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. एकाच बाजूने वाहने न्यावी लागत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघात वाढले आहेत. गडचिराेली-चामाेर्शी-आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैकापासून सुरुवात करण्यात आली. कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची  दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन कंत्राटदाराने पावसाळ्यात दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरू केली. मात्र, पावसामुळे अनेक अडथळे निर्माण हाेत हाेते. परिणामी दुसरी बाजू अजूनही पूर्ण झाली नाही. दुसऱ्या बाजूला खाेदकाम करून ठेवले आहे. यात पावसाचे माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर या मार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कंत्राटदारावर काेणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. 

रस्ता बंद ठेवून नालीचे बांधकामरस्त्याचे काम केले नाही; मात्र नालीचे बांधकाम केले जात आहे. ताेच मनुष्यबळ जर रस्ता बांधकामासाठी वापरला असता तर आतापर्यंत या मार्गाचे कामही झाले असते. मात्र, कामात नियाेजनाचा अभाव असल्याने कधी काेणते बंद करून दुसरेेच काम सुरू हाेईल याचा नेम राहिलेला नाही.

बाजूचे नागरिक व दुकानदारांना यातनामागील दीड वर्षापासून या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. अनेक दिवस रस्ता खाेदून ठेवला आहे. यात पाणी साचल्याने त्यातून वाट काढत आपल्या घराकडे जाणे कठीण हाेत आहे. अनेकांना आपली चारचाकी, दुचाकी वाहने दुसऱ्याच्या घरी ठेवून गुडघाभर पाण्यातून घर गाठावे लागत आहे. ज्या बाजूला काम झाले नाही. त्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरविली. परिणामी अनेकांचे धंदे बुडाले आहेत.

 

टॅग्स :highwayमहामार्ग